कचरू मानकर शहरी प्रतिनिधी प्रबोनिधी न्युज,गोंडपिपरी – तालुक्यातील मौजा वेडगांव येथे आज दिनांक 29 जानेवारी 2025 पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम सन 2024-25 अंतर्गत ज्वारी पिकाची 5 वी शेती शाळा घेण्यात आली.शेती शाळेमध्ये मागील शेती शाळेचा मागोवा घेण्यात येऊन शेती शाळेच्या 5व्या वर्गाची सुरुवात करण्यात आली यामध्ये ज्वारी पिक परिसंस्था निरीक्षणे व चित्रीकरण आणि सादरीकरण चर्चा तसेच निष्कर्ष काढण्यात आले.
कीटक नाशाकांचा वापर व मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि पिक कापणी प्रयोग या विषयी डी. बी. गादंगीवार कृषी सहाय्यक वेडगांव यांनी मार्गदर्शन केले. रोग व कीड आणि मित्र किटक, काढणी पश्चात उत्तपादन,तंत्रज्ञान खर्च व परतावा याचा ताळेबंद कसा काढायचा तसेच शेती पूरक व्यायसाय या विषयी मा. जी. बी पाटील कृषी पर्यवेक्षक धाबा -1,यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी मा. धिरेंद्र नागापुरे सरपंच ग्रा. प. वेडगांव, संगिता राऊत उपसरपंच, गुरूदास झाडे सदस्य, महिला शेतकरी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

