prabodhini news logo
Home ठळक बातम्या उज्वल भविष्यासाठी अभ्यासासोबत अवांतर वाचन महत्वाचे: मुख्याध्यापक ओ. बी. चोले

उज्वल भविष्यासाठी अभ्यासासोबत अवांतर वाचन महत्वाचे: मुख्याध्यापक ओ. बी. चोले

0
158

प्रितम माकोडे तालुका प्रतिनिधी मोहाडी – आज दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी इंदुताई मेमोरियल कनिष्ठ महाविद्यालय हरदोली येथे वर्ग 12 वी कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक ओमप्रकाश चोले, प्रमुख मार्गदर्शक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक जयंत राऊत तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन त्रीशरण मेश्राम, संजयकुमार जांभूळकर, अनाथपाल वैद्य, प्रतिक राठोड, प्रा. मोनिका ठाकुर, प्रा. अश्विनी पाटील, प्रा. मनोहर सिंगनजुडे, प्रा. मोहन झोडे, प्रा. संगिता कुकडकर, प्रा. निशा बोरकर, प्रा. वर्षा सुखदेवे, प्रा. शिवानी बाभारे, प्रा. प्रितम माकोडे, प्रा. कुणाल सोनकुसरे तथा शिक्षकेत्तर कर्मचारी किशोर शेंडे, समीर गायधने, मयुर भारती उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक जयंत राऊत यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वांगिण विकास कसा करावा यासाठी मोलाचे मार्गदर्शन करताना “दगडातून मूर्ती घडवायची असेल तर दगडाला घाव सोसावे लागतात त्याच प्रमाणे आपला विकास करावयाचा असेल तर आपल्याला सुध्दा घाव सोसावे लागतील’ या उदाहरनाच्या साहाय्याने तसेच धनंजय मुंडे यांचे उदाहरण देऊन उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे प्रा. मोनिका ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन करत भविष्यातील उपलब्ध संधीचे सोने कसे करावे, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याकरिता मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक ओमप्रकाश चोले यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी, उज्वल भविष्यासाठी अभ्यासासोबत अवांतर वाचनाची महत्व पटवुन दिले. यावेळी त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रेरणा दिली. तसेच वर्ग 12वी च्या विद्यार्थ्यांना परिक्षेकरीता शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमाचे आयोजन वर्ग 11 वी (कला आणि वाणिज्य) विभागाच्या विद्यार्थ्यांनी तथा वर्ग शिक्षकांनी केले. त्याच बरोबर कार्यक्रमाचे सुत्र संचालन खुशी शेंडे (वर्ग 11वी वाणिज्य) आणि स्विटी लुटे (वर्ग 11वी कला) तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिक्षा शेंडे (वर्ग 11वी वाणिज्य) यांनी केले. सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रा. निशा बोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here