भद्रावती प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आष्टा येथे बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिचंद्रजी काळमेंगे यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून आष्टा शाळेचे केंद्रप्रमुख साळवे सर, तसेच मागली शाळेचे केंद्रप्रमुख, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुकेशनी ताई पडवे उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन ठाकरे सर यांनी केले या शाळेचे मुख्याध्यापक कुत्तरमारे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच आभार प्रदर्शन त्रिवेदी मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला गावातील मंडळी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते तसेच गावकऱ्यांनी या बाल आनंद मेळाव्याचा उत्कृष्टपणे प्रतिसाद दिला व बाल मेळाव्यात विद्यार्थ्यांना त्यांचे लुप्त गुण कसे आहे ते बघितले.

