सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न…

0
64

प्रितम माकोडे तालुका प्रतिनिधी मोहाडी – मोहाडी: श्री. गुरुदेव चिंतामण बिसने कन्या विद्यालय व सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालय,मोहाडी येथे शनिवार दि.०१ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी १० वाजता इयत्ता अकरावीच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्याकरिता निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. अभिजीत आनंदराव वंजारी, प्राचार्या सुषमा अभिजीत वंजारी. प्रमुख अतिथी म्हणून उपअभियंता मा.दिलीपरावजी गायधने, पत्रकार मा.यशवंत थोटे , पर्यवेक्षक मा .दिनेश सेलुकर व्यासपीठावर उपस्थित होते.यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी बुध्दीची देवता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.इयत्ता अकरावीचे साक्षी चामट, विशाखा पवनकर , दिप्ती शेंडे, मोक्षदा डोंगरे बारावीचे संदिप गायधने, संकल्प गायधने, स्वीटी निखारे काजल मांढरे, साक्षी गायधने , तेजस्विनी सव्वालाखे, काजल मोहतुरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शिक्षक प्रा. सुषमा राघोर्ते, प्रा. नरेंद्र गायधने, प्रा. प्रिया निमकर, प्रा. पल्लवी चांदेवार, प्रा. ओमकार डोंगरवार,.प्रा. प्रणाली मोटघरे, प्रा. रेश्मा खोकले, प्रा. माधव राखडे आदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला सुनिता भोगाडे, वर्षा भोवते, लिला जिभकाटे,वनिता बोरकर,भुमेश्वर धकाते, उत्कर्ष दुबे, रंजित शेंडे, कल्याणी दुबे, सपना चौबे, प्रगती ठाकरे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बाबूजी नरेश देशभ्रतार,श्रावण गभने हजर होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिचर उषा मेश्राम,तारा बावनकुळे,पवन पडोळे व विद्यार्थी साक्षी चामट, समय वाघमारे , अक्षद मेश्राम, रिया गभने , आयुषी निंबार्ते , आचल झंझाड, कशीश निंबार्ते , वंशीका मदामे, स्नेहा चकोले, निशांत मालाधरी यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन आदेश गाढवे तर आभार सुमित झेलकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here