जिवती प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण – चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पेदाआसापूर येथील सन 2022-23 मधील जल जिवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली नळ योजना रद्द करून पूर्ण नवीन विहीर व नवीन नळ योजना 30000 लिटर पाण्याची नवीन टाकी मंजूर करून देणे बाबत चा निवेदन समस्त पेदाआसापूर वाशिय जनतेकडून दि. 24/04/2023 रोजी देण्यात आले होते. परंतु तब्बल 2 वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा आम्हा नागरिकांना न्याय मिळालेला नाही. पेदाआसापूर येथील जनतेला दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. ह्या पाण्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. म्हणून संपूर्ण नळ योजना नवीन मंजूर करून तात्काळ कामाला सुरुवात करण्यात यावे अन्यथा सर्व गावकरी रस्त्यावर उतरेल व तीव्र आंदोलन करेल. या आंदोलनात काही उचित किंवा जीवित हानी घडल्यास संबंधित विभाग जबाबदार असेल असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी मा. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा (जि. प.)विभाग चंद्रपूर यांना दिले. यावेळी उपस्थित. सरपंच मंगेश सोयाम, विशाल राठोड, कृष्णा चव्हाण, देविदास पवार, हंजारी राठोड व गावकरी होते.

