५० व्या वर्षानिमित्त आधिष्ठान अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळा
कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. ९८६०९१००६३, ७६२०२०८१८० – श्री. क्षेत्र धामोरी ते श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेनिवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर या दिंडी सोहळ्याची मनोभावे सेवा करून वारकरी संप्रदायाची भगवी पताका उंचावत ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे हरिभक्त परायण कारभारी महाराज माळोदे व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांचा निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्तांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.
दिंडीच्या यशस्वी आयोजना बद्दल ज्ञानदेव मांजरे हरिभक्त परायण राजेंद्र आरगडे हरिभक्त परायण राजेंद्र शिवाजी वाणी हरिभक्त परायण रावसाहेब जगताप प्रकाश वाघ भास्करराव मांजरे यांचा दिंडी मंडळाच्या वतिने सत्कार संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केला यावेळी रवींद्र पगार शरदराव वाणी शिवाजी दवंगे बाळासाहेब वाघ गणेश आरगडे राजेंद्र बारे सुजित वाघ राहुल जगझाप लक्ष्मण वाणी बाळासाहेब भाकरे बाळासाहेब पगार चंद्रभान साळुंखे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते धामोरी येथीलअधिष्ठान अडबंगनाथ पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने गुरुदत्त पतसंस्था धामोरी चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव पाटील मांजरे यांचे हस्ते निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या अध्यक्ष ह भ प कांचन जगताप सचिव हभप अमर ठोंबरे ह भ प श्री नवनाथ महाराज गांगुर्डे तसेच सर्व विश्वस्तांचा व पत्रकार श्री रामदास शिंदे हरिभक्त परायण शिवा महाराज आडके हरिभक्त परायण माधव महाराज पैठणकर प्रति जेजुरी देवस्थानचे महाराज तसेच श्रावण महाराज जगताप यांचा सन्मान श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ शॉल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या त्र्यंबकेश्वर येथील विश्वगुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या प्रांगणातील भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी केले या सत्कार सोहळ्यासाठी संस्थानचे सर्व पदाधिकारी कर्मचारी व वारकरी भाविक बंधु भगीनी मोठया संख्येने हजर होते.

