सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्था (NSPO) ची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशनच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा 17,18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी अहिल्यानगर येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 19 वर्षाखालील मुलांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे त्यांची एप्रिलमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या खेळाडूंना स्टेअर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजन समितीच्या अध्यक्षा प्रगती कथले, जिल्हा निरीक्षक विशाल चव्हाण तसेच फुटबॉल प्रशिक्षक कार्तिक यांचे मार्गदर्शन लाभले. या विजयामुळे संपूर्ण जिल्ह्यातून आणि क्रीडा क्षेत्रातून या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

