वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने रमाई जयंती महोत्सव कार्यक्रम संपन्न

0
145

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर : रमाई या त्याग आणि समर्पणाचं मूर्तीमंत प्रतीक आहे. त्या आयुष्यभर बाबासाहेबांसाठीच जगल्या. प्रत्येक प्रसंगात त्या बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या, असे प्रतिपादन प्राजक्ता वाकडे यांनी केले.
वंचित बहुजन महिला आघाडी महानगरच्या वतीने रमाई जयंती महोत्सव कार्यक्रम दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी चंद्रपूर विश्रामगृहात उत्साहात पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन मोनाली पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी तनुजा रायपुरे यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राजक्ता वाकडे, अँड. श्रध्दा गोवर्धन तर प्रमुख अतिथी लता साव, रिचा लोणारे, सुलभा चांदेकर, विजया भगत, प्रज्ञा रामटेके, वैशाली साव याची तर स्वागताध्यक्षा म्हणून शिल्पा प्रविण वनकर आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

सर्वप्रथम दीप प्रज्वलन आणि पाहुण्यांच्या स्वागतानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात तनुजा रायपुरे यांनी रमाई आंबेडकर यांच्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मंचावर उपस्थित निर्मला पाटील, अँड. श्रध्दा गोवर्धन, लता साव, कांता खंडाळे, विजया भगत, वैशाली साव यांनी ही आपले विचार व्यक्त केले. यानंतर सत्कारमूर्ती वंचित बहुजन आघाडीच्या जेष्ठ नेत्या यशोधरा कवाडे आणि भारतीय बौध्द महासभेच्या जेष्ठ नेत्या तारा मेश्राम यांचा शाल आणि स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एकपात्री नाटक “मी रमाई बोलते” सोनल चांदेकर यांनी उत्कृष्ट सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदु डोंगरे यांनी केले. संचालन सुनिता तावाडे यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रप्रभा रामटेके यांनी केले. या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here