प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपुर – शिवसेना मुख्यनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी, चंद्रपुर जिल्हाप्रमुख मिनल आत्राम यांच्या उपस्थितीत शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील सार्वजनिक बांधकाम विश्राम गृहामध्ये जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढ़ीसाठी प्रयत्न करणाऱ्या जेष्ठ शिवसैनिकांना शाल व श्रीफल देत सत्कार करुन सन्मान करण्यात आला.
तसेच भदंत चंद्रमणी नॅशनल पार्क, अष्टभुजा वार्डातील भदंत धम्म घोष मेत्ता भिक्खू संघ बौद्ध विहारात भंतेजी व विद्यार्थी भंतेजींना ब्लैंकेट वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे चंद्रपुर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना उपचाराकरीता बाहेरगावून घेवून आलेल्या नातेवाईकांना भोजनदान करण्यात आला आणि डेबू सावली वृद्धाश्रम, देवाळा येथील वृद्धांना फळवाटप करीत असतांना त्यांनी शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला दीर्घ आयुष्य लाभो व त्यांचे आरोग्य चांगले राहण्याचा आशिर्वाद दिला. असे विविध कार्यक्रम घेवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना चंद्रपुर वैद्यकिय मदत कक्ष जिल्हाप्रमुख तथा वाहतुक जिल्हाप्रमुख अरविंदजी धिमान, चंद्रपुर तालुका संघटक संजयकुमार शिंदे, बल्लारपुर विधानसभा महिला संघटिका कृष्णा सुरमवार, शिवसेना दिपक रेड्डी, उपतालुका प्रमुख विक्की महाजन, उपशहर प्रमुख सूचक दखने, उपशहर प्रमुख विश्वास खैरे, युवासेना उपशहर प्रमुख साहिल गाणफाडे, भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे, मंगेश वांढरे, साहेबराव आठवले, सूरज पारखी, भगवानदास रॉय, विवेक दुर्गे आदी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

