मोहाडी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – तालुक्यातील भिकार खेडा येथे डॉक्टर पुरुषोत्तम बोंदरे यांच्या मातोश्री अनुसयाबाई बोंदरे यांचे दुःखद निधन दिनांक-28/01/2025 रोज मंगळवार ला स्वर्गवासी झाली, त्यानिमित्ताने 14 वी कार्यक्रम दिनांक-10/02/2025 रोज सोमवारला त्यांचे राहते घरी दुपारी तीन ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत शाहीर कलावंतांनी गायनाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली, याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले, यावेळी विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, शाहीर अरुण मेश्राम, सुप्रसिद्ध गायक युवराज अडकणे, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका तनुजा नागदेवे, विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, गायिका नीलकमल गोंडाने, गायिका साधना बोरकर, महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे भंडारा जिल्हाध्यक्ष शाहीर गणेश देशमुख, शाहीर रमेश रामटेके, शाहीर राजू गजभिये, दिलीप मानापुरे, बॅन्जो कलाकार नरेंद्र भाऊ बोरकर, गायिका प्रिया डोंगरे, शाहीर ज्ञानेश्वर पाटील, शोबिलाल बोरकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बोंद रे, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर पुरुषोत्तम बोंदरे यांनी केले, मोठ्या संख्येने शाहीर कलाकार गावातील नागरिक उपस्थित होते.

