भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – वरोरा दिनांक १३ फरवरी २०२५ ला राष्ट्रीय महिला दिवस व सरोजिनी नायडू यांची जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. सी सी पि कार्यक्रमाअंतर्गत स्वतंत्र भारताच्या पहील्या राज्यपाल व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती साजरी करण्यात आली सोबतच आंतरराष्ट्रीय नैसर्गिक दिवस व जागतिक रेडिओ दिवस साजरा करण्यात आला.सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय महीला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन स्त्रियांचे आरोग्य, शिक्षण, विकास, उद्योग ईत्यादी विषयी माहिती दिली.तसेच आंतरराष्ट्रीय नैसर्गिक दिवस विषयी,रेडीओ दिनाविषयी माहीती दिली.गरोदर मातांना सि सि पि विषयी माहिती दिली.दिप प्रज्वलन करून सरोजिनी नायडू यांच्या फोटोंचे माल्यार्पन करून पुजन केले.कार्यक्रमासाठी कल्याणी कस्तूरे अप.,साक्षी किन्नाके,रिना किन्नाके, सुषमा काकळे यांनी मेहनत घेतली.गरोदर लाभार्थी यांनी सुध्दा दिपप्रज्वलन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

