मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जामनेर, जळगाव येथे ‘नमो कुस्ती महाकुंभ 2.0’ स्पर्धा पार पडली.
कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे. जोपर्यंत कुस्ती गोद्यातली होती, तोपर्यंत आपलाच बोलबाला होता. परंतु ती मॅटवर गेल्यावर आपण काही प्रमाणात मागे गेलो. मात्र, याच कुस्तीने आपल्याला इतिहास रचत पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे स्व. खाशाबा जाधव दिले. आता पुन्हा एकदा महिला आणि पुरुष कुस्तीपटू जागतिक पटलावर उत्तम कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. अशा कुस्तीपटूंसाठी ‘नमो कुस्ती महाकुंभ 2.0’ स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंत्री गिरीष महाजन यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारताचे कुस्तीपटू विजय चौधरी, पृथ्वीराज पाटील आणि महिला कुस्तीपटू सोनाली मंडलिक यांना विजयी झाल्याबद्दल चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री व आ. अनिल पाटील, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. संजय कुटे, आ. अमोल जावळे, आ. अनुप अग्रवाल, कुस्तगीर संघाचे अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

