
कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677- मौजे धामोरी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यशवंत पेखळे यांनी मुंबई येथे राहणारे भगवान यशवंत पेखळे यांची वडिलोपार्जित असलेली गट नंबर सर्वे नंबर ६६ मधील ४४ आर क्षेत्र बळकवली आहे शेत जमिनीची आत्ताची अंदाजीत किंमत तीस ते पस्तीस लाखापर्यंत आहे सन 1995 मध्ये एकत्रित कुटुंबात असताना फळबाग सबसिडी घेण्यासाठी एक हेक्टर क्षेत्र एका व्यक्तीच्या नावे असणे आवश्यक होते पण कोणाच्या नावे तेवढे क्षेत्र नसल्यामुळे श्री भगवान यशवंत पेखळे यांचे 44 आर क्षेत्र हे श्री ज्ञानेश्वर यशवंत पेखळे यांचे नावे बँक सोसायटी एज्युकेशन कामी तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले होते त्यांचा फेरफार क्रमांक 1992 असा आहे सन 2003 मध्ये आमच्या कुटुंबाचे विभक्तीकरण झाले त्यावेळेस ही जमीन श्री क्षेत्र भगवान यशवंत पेखळे सर्वात लहान असून वडिलोपार्जित हिस्सा घेण्यासाठी हजर राहिले नाही हिस्सा घेण्यासाठी आग्रह धरला नाही पण 2003 ते 2019 सालापर्यंत श्री भगवान यशवंत पेखळे यांच्या इस्तेला आलेली सर्व बागायती शेतजमीन विहीर मोटार ट्रॅक्टर चे सर्व अवजारे पाईपलाईन तीस पत्र्याची कांद्याची चाळ सर्व विकून संपवले त्यातील एकही रुपया ज्ञानेश्वर पेखळे यांनी श्री भगवान पेखळे यांना दिला नाही व शेतीच्या एकूण उत्पन्नापैकी एकही दाना भगवान पेखळे यांना दिला नाही एवढे असताना देखील ज्ञानेश्वर पेखळे यांनी श्री भगवान पेखळे यांना वाटणी बाबत फेरफारनुसार दिलेली जमीनही त्यांनी आपली पत्नी सारिका पेखळे हिच्या नावावर गावातील काही गावगुंड तलाठी यांच्या मदतीने तिच्या नावावर केली इतका मोठा विश्वासघात करूनही त्यावर समाधान न मानता ते क्षेत्र तिरहित व्यक्तींना विकण्याच्या तयारीत आहे हे मला माहीत झाल्यानंतर आपसात वाद मिटवण्यासाठी आमचे मोठे बंधू दत्तात्रेय यशवंत पेखळे नामदेव चंद्रभान पेकडे हरिभाऊ नारायण टेकळे हे साक्षीदार ज्ञानेश्वर तेखळे याला समजावून सांगतात परंतु तो त्यांचे ऐकत नाही त्यांनाही तो शिवीगाळ करतो तेव्हा दुसरा पर्याय म्हणून गावातील पोलीस पाटील, विजय भानुदास ताजणे व तंटामुक्ती अध्यक्ष व सचिव तसेच गावातील प्रतिष्ठित पंच जमा करून समजावण्याचा प्रयत्न केला असता तो बैठकीत हजर राहिला नाही तसेच श्री भगवान पेखळे यांना फोनवर शिवीगाळ करत माझी बदनामी करत असल्याचे धमकळत आहे या बातमीद्वारे तमाम गावातील गावकरी व पंचक्रोशीतील लोकांना कळविण्यात येते की सदर खूप क्षेत्र हे वादातील आहे त्यामुळे कोणीही हे क्षेत्र विकत घेऊ नये असे काही आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे सर्व प्रकरण शिजवण्यासाठी जे दोषी सापडतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे भगवान यशवंत पेखळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे सदर जमिनीची वाद मिटेपर्यंत कोणीही ती जमीन खरेदी करू नये अशी हरकत टाकण्यात आली आहे.














