भारत देशाने अनेक वीर पुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकापासून आपल्या हृदयात जतन केलेल्या आहे. आत्तापर्यंत निर्माण झालेले वीरपुत्र पवित्र भारत मातेच्या भूमीत जन्माला आले. हे खूप मोठे आपले भाग्य म्हणावे, असेच एक वीरपुत्र शक्तिशाली, निष्ठावान पराक्रमी , बलाढ्य राजा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले ते म्हणजे हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासन कर्ता ,जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज भोसले.एक सर्वसमावेशक, संहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि साऱ्या विश्वात वंदनीय मानले जातात. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० ला जुन्नर जवळ शिवनेरी गडावर जिजाबाई च्या पोटी जन्माला आला आणि भारतभूमीला एक पराक्रमी राजा मिळाला. अनेक पराक्रमाने त्यांनी इतिहास घडविला आणि त्यांचे नाव सुवर्ण अक्षराने इतिहासाच्या पानावर कोरल्या गेले. आणि म्हणूनच अजूनही ते सर्वांच्या हृदयात जिवंत आहेत, तसेच येणाऱ्या काळात देखील जिवंत राहणार आहे. महाराजांना राज्य शासनाचे आणि बुद्धी कौशल्याचे धडे राजमाता जिजाऊ कडून मिळाले. अगदी लहानपणापासूनच धार्मिक कहाण्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार जिजाबाई करीत होत्या.त्याशिवाय
तलवारबाजी ,घोड्यावर स्वार होणे यात तरबेज करून प्रशिक्षण देत असे.प्रतिकूल परिस्थितीत गुलामी परंपरेत मुघल साम्राज्य आपल्यावर करीत असलेल्या अन्यायाची जाणीव त्यांना होत होती.हे त्यांना बघवत नव्हते आणि या अत्याचारातून आपल्या रयतेला मुक्त करण्याचा त्यांनी वसा उचलला व जनतेची सुटका कली.तसेच हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःला पडूधणे बांधून घेतले.महत्वाचे गडकिल्ले जिंकले. नव्ये निर्माण केले योग्य त्यावेळी आक्रमक किंवा गरज पडेल त्यावेळी आक्रमक किंवा गरज पडेल त्यावेळी हे सूत्र हुशारीने वापरून अनेक शत्रूना नामोहरण केले.मुळात शिवाजी महाराजांमध्ये शौर्य ,दरारा,
स्वावलंबन वाखाणण्यासारखा होता.मनुष्य गुणांची उत्तम पारख त्यांना होती. म्हणूनच बाजीप्रभू, तानाजी, येसाजी मुरारबाजी जीवा यांच्यासारखे निष्ठावंत व स्वामीभक्त त्यांना लाभले होते,. खरंच आदर्श राजा शुर नेता म्हणजेच शिवाजी महाराज.न भूतो न भविष्यती असा हा राजा. दूरदृष्टी ,प्रसंगवधान योजनाबद्धता, जागरूक कार्यकुशलता ,न्यायप्रियता, कर्तव्यकठोरता शीबंदृष्टीपणा हे सर्व गुण त्यांच्या जवळ होते. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना होती. त्यांच्या राज्यात महाराजांनी कधी स्त्रियांवर अन्याय होऊ दिले नाही. प्रजेचा मुखाचा विचार, प्रजेच्या आनंदात सुख मानणारा इतर धर्मियांचा आदर बाळगणारा असा हा रयतेचा महानायक होता, प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून खऱ्या अथनि ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय ‘ याचा प्रत्यय आणून दिला. मुळात शिवाजी महाराजांमध्ये शौर्य ,पराक्रम शारीरिक क्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन व नियोजनबद्ध प्रशासन मुशद्दीपना, धाडस ,दृष्टिपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात.म्हणूनच त्यांना म्हटले जाते
प्रौढ प्रताप पुरंदर…. क्षत्रिय कुलावतंस… सिंहासनाधीश्वर… महाराजधीराज निश्वमाचा में हामेरू… बहुतजनांसी आधारू….अखंड स्थितीचा निर्धार… असे श्रीमंत योगी… रयतेचा राजा. जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज.
खरंतर १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी आपले सहकारी मावळे यांच्या साह्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले .हिंदवी स्वराज्य हिताचे
गडकिल्ले जिंकले. नवे निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरोखरच प्रेरणादायी आहे.
आजच्या युवा पिढीला शिवाजी महाराजांचे विचार एक नवी दिशा दाखविला तसेच प्रत्येकाने शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजे आणि त्याच विचाराने सर्वांबद्दल आदराची भावना ठेवली पाहिजे, तेव्हाच शिवजयंतीचा उत्सव हा खऱ्या अर्थाने सार्थ होईल.
संगीता राजेश नागदिवे…
यवतमाळ

