जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – पवनी तालुक्यातील सुजाता कन्या विद्यालय अड्याळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ह्याप्रसंगी अध्यक्षीय स्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. भारती गिरडकर यांनी भूषविले.कार्यक्रमाला प्रमुख यांनी म्हणून सहाय्यक शिक्षक एस. आर. नागपुरे, के.एम. पचारे, सहाय्यक शिक्षिका एल. एम. शेंडे आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि प्रमुख अतिथी यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धेद्वारे प्रकाश टाकला. विद्यालयातर्फे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्याने रांगोळी स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथींनी छत्रपती शिवाजींच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या पाळण्यावर सुंदर असे नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी अंशु विनकणे हिने मानले. विद्यार्थिनींचे तोंड गोड करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

