prabodhini news logo
Home ठळक बातम्या नवनित विद्यालय येथे शिवजयंती साजरी

नवनित विद्यालय येथे शिवजयंती साजरी

0
317

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशिय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा द्वारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) येथे दि. १९ फेब्रुवारी २०२५ ला श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचा कार्यक्रम शाळेत साजरा करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र गणविर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.
यावेळी चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक जान्हवी हरदे, व्दितीय क्रमांक रिंकू हरदे निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक आरूषी दमाहे, व्दितीय क्रमांक शेजल पाटील या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नरेंद्र गणविर तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव हिरालाल गजभिये, सुनिल नागदिवे, प्रा. नानाजी गजभिये, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरूण कांबळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये, संजीव मेश्राम, मानषी पंजरे, अपूर्वा दमाहे, श्रावणी मेश्राम, सोनू कस्तूरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सुमिता गजभिये व आभार प्रदर्शन निर्मला रंगारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here