prabodhini news logo
Home ठळक बातम्या लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

0
93

अनिकेत दुर्गे उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मुंबई दि.24 आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गीतकार ; संगीतकार ; पहाडी आवाजाचे गायक लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून निघणार नाही अशी प्रचंड हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांनी आंबेडकरी चळवळीला आपले संपूर्ण आयुष्य वाहिले.आजीवन ते अविवाहित राहून त्यांनी गीत संगीत शाहिरी द्वारे आंबेडकरी चळवळीत मोठे योगदाना दिले आहे.भारतीय दलित पँथर पासून प्रभाकर पोखरीकर यांनी मला साथ दिली.त्यांनी एकनिष्ठपणे माझ्या नेतृत्वावर प्रेम केले.रिपब्लिकन चळवळीला ताकद दिली.आजीवन त्यांनी केवळ भीम गीते बुद्ध गीते; आणि आंबेडकरी चळवळीला प्रेरणा देणारी गीते लिहिली.त्यांनी काढलेली जिवाला जीवाचे दान ही कॅसेट गाजली.छाती ठोकून सांगू जगाला हे त्यांनी लिहिलेले गाणे जगभर गाजले.लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर हे आंबेडकरी चळवळीला समर्पित लोकशाहीर होते. लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर लोककलेतील आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ ठरले होते.परिवर्तन कला महासंघाचे ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर मूळचे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावचे होते.मुंबईत ते मालाड मालवणी; अमर महाल चेंबूर;रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर आणि आता कळवा येथे वास्तव्यास होते.त्यांचे आज दि.24 फेब्रुवारी रोजी पहाटे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे अल्पशा आजाराने वयाच्या 60 व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज दि.24 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता चैत्यभूमी जवळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
येत्या दि.5 मार्च रोजी माता रमाबाई आंबेडकर नगर येथे दिवंगत लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांची परिवर्तन कला महासंघ आणि रिपब्लिकन पक्षातर्फे जाहीर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here