सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार शारदा भुयार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

0
81

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – कारंजा येथील स्त्री शक्ती मंच संघटनेच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, कवयित्री आणि पत्रकार शारदा अतुल भुयार यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान वैदभिय नवनाथ ट्रस्ट द्वारे प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार सईताई डहाके, आमदार हरिष पिंपळे, पुनम पवार स्वागताध्यक्ष निलेश सोमानी, स्वागताध्यक्ष गीरीलाल सारडा, प्रमुख अतिथी संजय कडोळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

शारदा भुयार यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. स्त्री शक्ती मंच संघटनेच्या माध्यमातून बावीस जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य त्या करत आहेत.

त्यांना यापूर्वीही अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2023 मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या हस्ते “समाजभूषण पुरस्कार” मिळाला होता. तसेच, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था पुणे यांच्या अमरावती विभागीय अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. या संस्थेच्या वतीनेही त्यांना समाजरत्न पुरस्कार 2023 मिळाला होता.

साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे असून “त्यांचा विस्तव” हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे, तसेच “अंकुश” हा राज्यस्तरीय काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहे. त्यांच्या कवितांचे प्रसारण आकाशवाणी नागपूर व अकोला केंद्रावरून झाले आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, औरंगाबाद येथे त्यांच्या कवितांचे गायन केले आहे.
शारदा भुयार यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here