
मयुर देवगडे ब्रम्हपुरी प्रतिनिधी : बिहार येथील महाबोधी महाविहार मनुवादी व्यवस्थाच्या हातातून मुक्त करून ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना मा, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.
या मागणीचे निवेदन ब्रम्हपुरी तालुक्यातील सामाजिक व आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या समस्त समाज बांधव यांच्या तर्फे देण्यात आले भारत देशात विविध जाती धर्माच्या धार्मिक भावना समावलेल्या आहेत त्यामुळे बिहार येथील महाबोधी विहार हे बौद्ध तत्वाचे पालन करणारे या देशातील सर्वश्रेष्ठ बौद्ध स्थळ आहे जसे या देशात ज्याप्रमाणे हिंदूचे मंदिर हिंदू च्या ताब्यात मुस्लिम चे म्शजिद मुस्लिममांच्या ताब्यात ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत तर बौद्धांचे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही ?असा प्रश्न जगातील सर्व बौद्ध बांधवांना पडला आहे
म्हणून बिहार सरकारच्या 1949 च्या महाबोधी महाविहार मंदिर व्यवस्थापण अधिनियमात दुरुस्ती करून ते बौद्धांच्या व बौद्ध भिक्षुंच्या ताब्यात देण्यात यावे कारण बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथील व्यवस्थापण समिती 9 सदस्यसीय आहे मात्र या सदस्यमध्ये 4 बौद्ध व 5 हिंदू समाजाचे लोक आहेत त्यामध्ये समितीचे अध्यक्ष हा जिल्हाधिकारी हिंदू धर्माचा असल्याने बौद्ध समाजातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या करिता आमची मागणी रास्त असल्याने ती तात्काळ पूर्ण करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वश्री जबाबदारी भारत सरकार व प्रशासनाची राहील असा इशारा सुद्धा देण्यात येईल.
यावेळी निवेदन देताना प्रा,डॉ युवराज मेश्राम डॉ केशीप पाटील, लीलाधर वंजारी, डेनी शेंडे, रोशन मेंढे अनिल वाळके, गणेश डांगे, प्रभू लोखंडे, सुकेशनी बन्सोड, चंद्रशेखर मेश्राम, जयदेव शास्त्रकार, अक्षय भैसारे तथा असंख्य सामाजिक व आंबेडकरी चळवळीत काम करणारे समाजबांधव उपस्थित होते.















