लाडक्या बहिणीच्या नजरा सरकारच्या हप्त्याकडे
मयुर देवगडे ब्रम्हपुरी प्रतिनिधी – राज्यसरकारने विधानसभा निवडणुकी पूर्वी महिलांच्या हिताकरिता महिलांसाठी राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, सदर योजनेमध्ये
२१ ते ६० या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाखापेक्षा कमी असणाऱ्यांना महिला व आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना प्रतिमहिना मिळणार १५०० रूपये दिले जात होते.
परंतु, काही महिलांच्या खात्या मध्ये जानेवारी चा हप्ता मिळाला नसून फेब्रुवारी चा हप्ता सुद्धा रखडलेला दिसून आल्यामुळे महिला संभ्रमित होऊन मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद झाली की काय ? असा सवाल उपस्थित करत आहेत. तर एकीकडे लाडक्या बहिणीची संख्या कमी होताना दिसत आहे,
लाडक्या बहिणीकडे चार चाकी वाहन आहेत काय ? याची पडताळणी महिला व बालविकास विभागाकडून होत आहे या पडताळणी साठी विलंब होत असल्यामुळे लाडक्या बहिणीचा निधी थांबला आहे असे विभागाकडून सांगितले जात असून आता समोरचा हप्ता केव्हा मिळणार याकडे सर्व लाडकी बहिणीचे लक्ष आहे.

