निमलगुडम शाळेत पाणी योजना कधी ?

0
42

मुलांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.

तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक मिरालवार 8830554583 – गुड्डीगुडम: अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या निमलगुडम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नळपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली नाही. परिणामी शाळेतील विद्यार्थी हातपंपाच्या पाण्यावर आपली तहान भागवत आहेत. मात्र, याबाबत पंचायत समिती प्रशासन व शिक्षण विभाग सुस्त असल्याचे दिसून येते.

विद्यार्थ्यांच्या सोयींकरिता जिल्ह्यातील प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा प्रशासनाने शाळेत उपलब्ध असलेल्या पाण्याचे स्रोतातून नळ योजना पुरवठा कार्यान्वित केली आहे. मात्र निमलगुडममध्ये अभाव आहे.

विद्यार्थ्यांना होत आहे त्रास..

सदर शाळेतील हातपंपावरच विद्यार्थी आपली तहान भागवतात. सदर प्राथमिक शाळेत ६ ते १० वर्षाआतील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतांश शाळेत नळ पाणी योजना कार्यन्वित केले परंतु सदर शाळेत ही योजना अंमलात आणण्यात आली नाही. लहानसे मुलं आपले मध्यान्ह भोजनाचे ताठ धुण्यास व पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here