शिवनी येथिल मुलीवर अत्याचार करणा-या विकृत मानसिकतेच्या नराधमांचा वंचितने केला जाहिर निषेध

0
112

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गडचिरोली शिवनी येथिल २३ वर्षीय मुलगी शौचास गेली असता काही विकृत मानसिकतेच्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने येथिल ईंदिरा गांधी चौकात जाहिर निषेध करून विकृत नराधमांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भ कमेटीचे समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वाात ईंदिरा गांधी चौकात जाहिर निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी विकृत नराधमांना तात्काळ अटक करण्यात यावी, फॉस्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, पिडीत मुलीला राज्य शासनाने १ कोटीरुपये मदत करावी, आदि मागण्या करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी निषेध करतांना बाळू टेंभुर्णे म्हणाले की लाडकी बहिण म्हणून महिलांना गोंजारण्याचा दिखावा केल्या जात आहे पन प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, त्याकडे जाणूनबूजून दुर्लक्ष केल्या जात असून या राज्य सरकारला मनुस्मृतीनूसार राज्य कारभार करायचे आहे. त्यामूळे महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. सदर प्रकरण काही राजकिय नेत्यांकडून दाबण्याचा प्रयत्न केल्या जाण्याची शंकाही व्यक्त केली.
जाहिर निषेध आंदोलन करून मुख्यमंत्री फडणवीस यांना जिल्हाधिका-यांमार्फत निवेदनही पाठविण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे, वंचित आघाडीचे जेष्ठ नेते जी के बारसिंगे, जेष्ठ नेते भरत येरमे, जेष्ठ नेते विलास केळझरकर, महिला आघाडी नेत्या जयश्री येरमे, अर्चना टेंभुर्णे, शहर महिला आघाडीच्या लता भैसारे, संघमित्रा राजवाडे, सुमन उंदिरवाडे, निर्मला टेंभुर्णे, शेवंता जांभूळकर, माया जांभूळकर, शुभांगी उंदिरवाडे, ज्योती चौधरी, दुर्मिता दुर्गे, युवक आघाडी उपाध्यक्ष कवडू दुधे, शेषराव तुरे, क्रिष्णा रोहनकर, शहराध्यक्ष तुळशिराम हजारे, भारत रायपूरे, भोजराज रामटेके, मंगेश रोहनकर आदिं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here