
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मुंबई दि.4 – आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ, संगीतकार, गायकप्रबोधनकार लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरिकर यांची जाहिर श्रध्दांजली सभा उद्या बुधवार दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता माता रमाबाई आंबेडकर नगर,घाटकोपर पूर्व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागे आयोजित करण्यात आली आहे. दिवंगत प्रभाकर पोखरिकर यांच्या जाहिर श्रध्दांजली सभेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.दिवंगत प्रभाकर पोखरिकर यांच्या श्रध्दांजली सभेत आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यंनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्ष आणि परिवर्तन कला महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवंगत प्रभाकर पोखरिकर हे आंबेडकरि चळवळीचा बुलंद आवाज होते. परिवर्तन कला महासंघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे निष्ठावंत समर्थक होते.त्यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीत भिम बुध्द गीते गात समाज प्रबोधन केले.छाती ठोक हे सांगू जगाला यांसारखी त्यांची अनेक गीते अजराअमर झाली आहेत. अजरामर लोकशाहीराला जाहीर श्रध्दांजली अर्पण
करण्यासाठी मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहान रिपब्लिकन पक्षाच्या करण्यात आले आहे. यावेळी परिवर्तन कला महासंघाच्या राज्य भारतील आंबेडकरी गायक लोककलावंत शाहीर आपल्या गायनातून लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
दिवंगत प्रभाकर पोखरिकर यांची जाहिर श्रध्दांजली सभा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आली असुन ही श्रध्दांजली सभा बुधवार दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागे माता रमाबाई आंबेडकर नगर,घाटकोपर पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे .या श्रद्धांजली सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्य वतीने करण्यात आले आहे.















