prabodhini news logo
Home ठळक बातम्या आरोग्य स्वास्थ राखण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त भंडारा येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आरोग्य स्वास्थ राखण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त भंडारा येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन

0
83

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – महिला सशक्तीकरण आणि आरोग्य स्वास्थ्य जागरूकतेचा संदेश देण्यासाठी भंडारा येथील बाइसिकल असोसिएशन, रोटरी क्लब, आई. एम. ए. असोसिएशन , मीणा फाउंडेशन, रोकडे ज्वेलर्स, यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2025 रोज शनिवार ला भव्य सायकल अवेअरनेस रॅली चे आयोजन करुण जनजागृती करण्यात येणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित जनजागृति रॅली दि.08 मार्च 2025 ला सकाळी 6.30 वाजता राजीव गांधी चौकातून सुरू होईल आणि खातरोड मार्गे पुढे जाईल. साधारण ८ ते १० किलोमीटर अंतर असलेल्या या रॅलीमध्ये १५ वर्षांवरील मुली आणि महिलांचा सहभाग राहणार आहे.

या सायकल रॅली मध्ये इच्छुक प्रथम १०० नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना मोफत टी-शर्ट देण्यात येणार आहे.सर्व सहभागी युवती आणि महिलांना प्रमाणपत्र आणि मेडल प्रदान केले जाणार आहे.

सायकलिंगचे आरोग्यासाठी लाभदायी असल्याने लोकजागृती

सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम असून हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीराची ऊर्जा आणि सहनशक्ती वाढते तसेच स्नायू बळकट होतात. नियमित सायकलिंग केल्याने तणाव कमी होतो आणि फिटनेस सुधारतो.

महिला सशक्तीकरणाचा संदेश

या सायकल रॅली च्या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आरोग्य आणि फिटनेसबाबत जागरूक करणे तसेच समाजात सायकलिंग संस्कृतीचा प्रचार करणे. त्यामुळे महिला आणि मुलींनी मोठ्या संख्येने या सायकल रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here