prabodhini news logo
Home कोपरगाव पात्र झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची अडचण जाणून घेण्यासाठी ग्राम विस्तार अधिकारी यांनी घेतली...

पात्र झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची अडचण जाणून घेण्यासाठी ग्राम विस्तार अधिकारी यांनी घेतली आढावा बैठक

0
297

कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. ७६२०२०८१८०, ९८६०९१००६३ – कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे दर वर्षापेक्षा यावर्षी घरकुल पात्र यादी सर्वात जास्त असल्याने घरकुलधारकांना काय अडीअडचणी आहे एक एक करून सर्वांच्या अडचणी ग्राम विस्तार अधिकारी बागले भाऊसाहेब यांनी जाणून घेतल्या त्यावेळेस ग्रामपंचायत मायगाव देवीचे सरपंच श्री दिलीप छबु शेलार उपसरपंच मुकुंद शंकरराव गाडे शिवसेना उभाठा गटाचे तालुका उपप्रमुख राजेंद्र नाजगड सुनील राधाकिसन गाडे भगवान विठ्ठल राव गाडे अण्णासाहेब बाजीराव गाडे आप्पासाहेब श्रीकृष्ण गाडे मायगाव देवी ग्रामपंचायत चे क्लार्क जगन शेलार साहेब संगणक परिचालक श्यामगीर गोसावी हजर होते. यावेळेस सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरासाठी लागणारी रेती या विषयावर सर्वात जास्त चर्चा करण्यात आली . योगायोगाने गोदावरी नदी पात्रातील सरकारी ठेका हा चालू असल्याकारणाने तुम्ही आधार कार्ड व मोबाईल नंबर जो लिंक असेल तो घेऊन या तुम्हाला घरकुलासाठी मोफत पाच ब्रास रेती दिली जाईल ऑनलाईन पद्धतीने सर्व अर्ज केल्यानंतर घरकुलासाठी तुम्हाला रेती उपलब्ध करून दिली जाईल हा सर्वाना भेडसावणारा प्रश्न ग्रामविस्तार अधिकारी बागले भाऊसाहेब यांनी सुटसुटीत भाषेत समजून सांगितला काहींचे जागेचे प्रॉब्लेम असल्याकारणाने तेही आपण सर्वांमध्ये विचार विनिमय करून मार्गी लावू तसेच भविष्यात घरकुलधारक ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी ऑनलाइन पद्धतीने कशा असतात याची जाणीव नसल्यामुळे ही मीटिंग आयोजित करण्यात आली होती उपसरपंच मुकुंदराव गाडे यांनी सर्व घरकुलधारकांचे अभिनंदन केले त्यास अनुमोदन भगवान गाडे यांनी दिले व शेवट आभार सुनील राधाकिसन गाडे यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here