
रोहिणी खोब्रागडे सहसंपादिका – साप दिसणं तर सोडाच; पण नाव निघालं तरी अंगावर काटा येतो. त्यात जर तो घरात किंवा परिसरात दिसला तर तारांबळच उठते. अशावेळी अनेकजण त्याला मारतात. मात्र त्याला न मारता आपण एमएच २९ हेल्पिंग हँडस्यचे सर्पमित्र राजू भोगेकार यांना कॉल करा. त्यांनी नुकतीच एक मोठी कामगिरी केली . तरोडा, सुंदरनगर येथील गणेश सिडाम यांच्या घरी साप असल्याची माहित मिडाली असत .तिथल्या दक्ष नागरिकांनी सर्वात आधी राजू भोगेकार यांना कळवलं.
क्षणाचाही विलंब न करता भोगेकार पोहचले . सर्वात आधी त्यांनी नागरिकांना धीर दिला. मग सापाचं निरीक्षण केलं. तो कृष्णशीर्ष ( काळतोंड्या) साप असल्याचे दिसले.त्याला योग्यरीत्या पकडून तेथील जनतेला माहिती दिली .
या सापाचे तोंड काळे असल्यामुळे याला काळतोंड्या असे म्हणतात. याला कृष्णशीर्ष असेही म्हणले जाते. हा साप जनिमी पासून आपली मान उंच करतो त्यामुळे याला नागाचे पिल्लू समजून त्याला मारल्या जाते. हा साप हुबेहूब पोवळा या विषारी सापासारखा दिसतो. काळतोंड्या व पोवळा या दोन्ही सापातील अंतर सूक्ष्म निरीक्षण केल्यावरच लक्षात येते . या सपाची लांबी सरासरी 1 फुट. अधिकतम 1.5 फुट असते.
या सापाची वणी येथील वनविभागामध्ये नोंद करुन वनपरीक्षेत्र अधिकारी यांना दाखवले.
त्यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक परिसरात सापाला सोडण्यात आले. यावेळी उपस्थित एमएच २९ हेल्पींग हंड्सचे वन्यजीव रक्षक रमेश भादीकर व राजु भोगेकर, अनिकेत कुमरे , संतोष गुम्मुलवार ,नितीन माणुसमारे, समीर गुरनुले, दिवेंद्र भोगेकर, अमोल, रोहित, दीपक, कुणाल, आशीष, दिनेश हे उपस्थित होते. एमएच २९ हेल्पींग हंड्सच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे..















