कोपरगाव तालुका प्रतिनिधी :इब्राहिम ऊर्फ मुन्नाभाई शेख
मो. ७६२०२०८१८०, ९८६०९१००६३ – कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे वंशपरंपरागत चालत आलेल्या रुढीनुसार होलिका दहणाच्या दुसऱ्या दिवशी मान मणता साजरी करण्याकरिता घराघरातून लहान मुलांना शूर योद्धा प्रमाणे सजवून गावातून मिरवणूक काढली जाते त्यानंतर मारुती मंदिर समोर जी मोठी होळी असते त्या होळी समोर सर्व ग्रामस्थ थांबून वीरांना नाचकाम करून होळीला प्रदक्षिणा घालतात व त्यानंतर वाण बोलले जाते ते ऐकण्यासाठी समस्त ग्रामस्थ तेथे उपस्थित असतात अशी ही अनोखी परंपरा सालाबाद प्रमाणे मायगाव देवी येथे साजरी केली जाते.

