सप्त खंजेरी वादक कु.भाविका खंडाळकर (नागपूर) यांचे जाहीर कीर्तन
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – पवनी तालूक्यातील उमरी(अड्याळ) येथील जय महाराष्ट्र ग्रुप च्या वतीने शिव जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने ( तिथीनुसार) 17 मार्च 2025 रोज सोमवारला रात्री 9.00 वाजता गांधी चौक येथे सत्यपाल महाराज यांची शिष्य सप्त खंजेरी वादक कु.भाविका सुखदेव खंडाळकर (नागपूर) यांचा समाज प्रबोधनात्मक जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिव जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित समाज प्रबोधनात्मक जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त जनतेनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष विश्वेश्वर मलोडे,उपाध्यक्ष सावन शिउरकर,नेहाल शिउरकर, सचिव कृष्णा मलोडे,प्रितेश चौधरी आणि कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्यगण यांनी केले आहे.

