prabodhini news logo
Home गडचिरोली भाजपा सदस्यता नोंदणी व बुथ रचना आढावा बैठक उत्साहात संपन्न..

भाजपा सदस्यता नोंदणी व बुथ रचना आढावा बैठक उत्साहात संपन्न..

0
134

गडचिरोली प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – २० मार्च २०२५: गडचिरोली शहर भाजपाच्या सदस्यता नोंदणी व बुथ रचना आढावा बैठक उत्साहात पार पडली. इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीत पक्षबांधणीच्या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी भूषविले. तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या सविस्तर मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.

बैठकीस माजी आमदार तथा भाजपा नेते डॉ. नामदेव उसेंडी, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे व अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहराध्यक्षा कविता उरकुडे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत सदस्यता नोंदणी आणि बुथ रचना प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध रणनीती आखण्यात आल्या. भाजपाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सर्व स्तरांवर अधिक प्रभावी कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here