वैजापूर प्रतिनिधी – वैजापूर नगरपरिषदच्या वतीने सीओ डॉ. संगीता नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत वैजापूरमधील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीचे आयोजन सकाळी ८ वाजता करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी “गल्ली स्वच्छ तर गाव स्वच्छ, गाव स्वच्छ तर शहर स्वच्छ” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या अभियानाचे मुख्य उद्दीष्ट नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणे आणि शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश पोहोचवणे होते.
स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत डॉ. संगीता नांदूरकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे वैजापूर शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

