prabodhini news logo
Home चंद्रपूर नाना – नानी पार्क समोर मोठ्या गड्यामुळे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला जीव...

नाना – नानी पार्क समोर मोठ्या गड्यामुळे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला जीव गमवावा लागला

0
364
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

लवकरात लवकर संबधीत ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टदार वरती कारवाई करा

अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसे रुग्ण मित्र कृष्णा गुप्ता

प्रशांत देशापांडे चिफ ब्युरो प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाकाली कॉलनी परिसरात नाना नानी पार्क समोरील एका मोठ्या गड्यांमध्ये दिनाक.१९/०३/२०२५ ला रात्रीचा सुमारे सात ते आठ वाजताच दरम्यान महाकाली कॉलरी प्रकाश नगर येथे राहणारे चिंताराम देवांगन हे नेहमीच प्रमाणे आपल्या रस्त्याने नाना नानी पार्क समोरील जात होते पण रात्रीची वेळ असल्यामुळे त्या रोडवरील असलेला गड्डा त्यांना दिसलेला नाही व गड्यांमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला “त्यांचा तो शेवटचा दिवस ठरला. त्या गड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत व एकाच जीव सुद्धा गेलेला आहे.

अशाप्रकारे आणखी अपघात टाळण्याकरीता लवकरात लवकर त्या परिसरामध्ये असलेल्या व चंद्रपूर शहरांमध्ये सर्वत्र खोद काम करून रस्ता फोडून ठेवलेला आहे लवकरात लवकर काम पुर्ण करण्यात यावे व कॅन्टीन चौक ते बायपास रोड वरील रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे व येना जाण्याकरिता रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यात यावा व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व गड्डे बुजवण्यात यावे या मागणीला घेऊन २६/०३/२०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रुग्ण मित्र कृष्णा गुप्ता व जिल्हा सचिव किशोर मङगुलवार व जिल्हा उपाध्यक्ष मनविसे कुलदिप चंदनखेडे, प्रविन शेवते, राकेश पडारकर, राजु देवांगन, प्रशांत रामटेके, राहुल बेसेकर, निखील दुर्ग, रोहीत कन्नाके उपस्थित होते.

चंद्रपूर शहरातील महानगरपालिका आयुक्त सराना व बांधकाम विभाग ( PWD) यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. व येत्या सात ते आठ दिवसांमध्ये काम न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) विभाग यांना दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here