जिल्हा परिषदेत अतित्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे गुणगौरव सोहळा संपन्न

0
94

मोजीस परमार विशेष जिल्हा प्रतिनिधी ठाणे – दि.‌२६ – जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत सेवेत कार्यरत असणाऱ्या वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती येथील आदर्श कर्मचारी यांना आज, दि.‌ २६ मार्च, २०२५ रोजी बी. जे.‌ हायस्कूल येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.‌

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे मार्गदर्शन करताना म्हणाले की,”एखादी संस्था कार्य करत असते तेव्हा त्या संस्थेअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचा त्या कामकाजामध्ये सहभाग असतो. सर्वांनी एकत्रित काम केल्याने जिल्हा परिषद संस्थेचा सर्वांगीण विकास होत आहे, त्यामुळे तुमचे काम मोलाचे आहे. जिल्हा परिषदेकडून सन्मानित केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. अधिक कार्यतत्परतेने यापुढे देखील तुम्ही काम करत राहा, अशी अपेक्षा करतो.‌”

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी जिल्हा परिषदेचे नाव‌ लौकिक करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचा वाटा मोलाचा असतो. तुम्ही केलेल्या कामामुळे जिल्हा परिषद नेहमी पुढे असते.‌ या पुढे देखील जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामकाज करण्याबाबत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वेगवेगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी काम करत असतात त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आपण जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे ही मोलाची बाब आहे, असे प्रतिपादन केले.‌

यावेळी मुख्य लेखा व‌ वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी व सत्कार मुर्ती व त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद स्तरावरील लघुलेखक उच्च श्रेणी (सामान्य प्रशासन विभाग) संजय सूर्यकांत कवडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी (आरोग्य विभाग) योगिता लक्ष्मण फाठक, विस्तार अधिकारी सांख्यिकी (आरोग्य विभाग) सुनिल वसंत कांबळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी (कृषी विभाग) मेघना बबन गोमासे, वरिष्ठ सहाय्यक (सामान्य प्रशासन विभाग) नरेंद्र बाळकृष्ण कुबल, कनिष्ठ सहाय्यक (आरोग्य विभाग) योगेश प्रकाश घाग, कनिष्ठ सहाय्यक (ग्रामपंचायत विभाग) श्रीकांत चौधरी, वाहनचालक (आरोग्य विभाग) रमेश मुकुंद विदे, हवालदार (लघुपाटबंधारे विभाग) लता यशवंत दळवी, परिचर (आरोग्य विभाग) महेंद्र भास्कर पाटील, तसेच पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकारी सांख्यिकी (पंचायत समिती अंबरनाथ) प्रदीप दत्तू मोहेकर, वरिष्ठ सहाय्यक (पंचायत समिती शहापूर) रमेश हरी लोभी, कनिष्ठ सहाय्यक (पंचायत समिती शहापूर) मेघराज विठ्ठल निमसे, कनिष्ठ सहाय्यक (पंचायत समिती कल्याण) सायरा संजय ऐगडे, वाहनचालक (पंचायत समिती मुरबाड) समिप हरदास, परिचर (पंचायत समिती शहापूर) दीपक विठ्ठल वेखंडे, परिचर (पंचायत समिती कल्याण) सुहासिनी कांगणे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा परिषदेकडून आज सन्मानित होताना अनेक जबाबदाऱ्या नव्याने वाढल्याने मी सर्वांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे आभार मानते, असे मत कनिष्ठ प्रशासन अधिकारी (कृषी विभाग) मेघना बबन गोमासे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेमार्फत आज मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते गौरव स्वीकारताना आनंद झाला. हा गौरव म्हणजे केलेल्या कामाला मिळालेली शाबासकी आहे. – हवालदार (लघुपाटबंधारे विभाग) लता यशवंत दळवी

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्या शिर्के यांनी उत्तम प्रकारे करून कार्यक्रमाची धुरा सांभाळली. सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here