मनसे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुके व गावांचा आढावा घेतल्यानंतर असे निर्दशनास आले कि, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली आहे ग्रामीण भागात सांडपाणी जाणारे नाली तुडूंब भरले असुन यामुळे जिल्ह्यात साथीचे रोग वेगाने पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. डेंग्यू, मलेरिया, तसेच अनेक घातक विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.
विशेषतः, जिल्ह्यात कार्यरत अनेक मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात दूषित सांडपाणी, धूळ आणि इतर प्रदूषक घटकांचे उत्सर्जन केले जात आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याची जनमानसात चर्चा आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तरी, आपण तातडीने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका, ग्रामपंचायत, पंचायत समित्या व नगरपरिषद स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश निर्गमित करून या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी व झालेल्या कारवाईचा अहवाल लेखी स्वरूपात आम्हाला प्रदान करावा या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, क्रिष्णा गुप्ता रुग्ण मित्र, राजु देवागंन, घनश्याम टिकले, राहुल बेसेकर शिष्टमंडळात उपस्थीत होते.

