भोर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पुणे येथील भोर पोलीस स्टेशन समोर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली मयत विक्रम भैया गायकवाड या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी भव्य घंटानाद आंदोलन करण्यात आले.
विक्रम भैय्या गायकवाड या तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी.
अजूनही झोपेचे सोंग घेतलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी नेते रामदास कांबळे यांच्या मार्गदर्शनाने भव्य असे घंटानाद आंदोलन पोलीस स्टेशन समोर करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष भोर तालुका अध्यक्ष सागर यादव यांनी केले यावेळी प्रचंड संख्येने युवक,महिला,आंबेडकरी समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भोर पोलीस ठाण्यासमोर घंटा वाजवून या घटनेचा निषेध करण्यात आला व या हत्याकांडातील सर्वच आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली.

