prabodhini news logo
Home ठळक बातम्या गिरीश देशमुख गोरठेकर, विद्याभारती इंग्लिश स्कूल उमरी च्या विद्यार्थ्यांचे ओलंपियाड परीक्षेत यश.

गिरीश देशमुख गोरठेकर, विद्याभारती इंग्लिश स्कूल उमरी च्या विद्यार्थ्यांचे ओलंपियाड परीक्षेत यश.

0
111

प्रशांत देशापांडे ब्युरो चीफ प्रबोधिनी न्युज नेटवर्क – उमरी : एस.ओ.एफ. या राष्ट्रीय स्तराच्या ऑलम्पियाड परीक्षेत उमरी येथील गिरीष देशमुख गोरठेकर, विद्याभारती इंग्लिश स्कुल उमरी चे 95 विद्यार्थी सहभागी होऊन या राष्ट्रीय परीक्षेच्या गणित व विज्ञान या विषयांमध्ये सहभाग नोंदवून यावर्षी तब्बल 20 सुवर्ण पदके मिळवण्याचा विक्रम केला आहे.यामध्ये गणेश जाधव, अक्षरा माने, श्रेया भोसले, आर्या कवळे, श्रेया भोसले, पार्थ कदम, श्रावणी शिंदे, स्वराज भोसीकर , अजिंक्य माने, श्रीनिवास अमृतवाड, सिद्धेश्वर लपशेटवार, विश्वजीत शिंदे, द्वारकामाई हैबते, विघ्नेश कोरेनेलु, कावेरी मोरे, लिंगराज पाटील, सौरव कदम, बाजीराव शिंदे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांना गुणपत्रक, प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देऊन सन्मानीत करण्यात आले.
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वच्चेवार, गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर आणि विद्याभारती सेकंडरी जूनियर कॉलेजचे प्राचार्य विश्वजीत देशमुख तळेगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळेतील शिक्षक शैलेजा आनंतवार, शिवानी चव्हाण, सारिका इब्तेवार, शेख रशीद, शेख फरहाना यांनी परिश्रम घेतले व या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी सुद्धा कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here