prabodhini news logo
Home जुन्नर प्रियदर्शी चक्रवती सम्राट अशोक यांची जयंती साजरी

प्रियदर्शी चक्रवती सम्राट अशोक यांची जयंती साजरी

0
169

जुन्नर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका कार्यकारिणीच्या वतीने दि ५ एप्रिल २०२५ ओतूर येथे समता सामाजिक महिला संघ ओतूर यांच्या नियोजनातून प्रियदर्शी चक्रवती सम्राट अशोक जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका अध्यक्ष मा.राकेश डोळस हे होते,तसेच केंद्रिय शिक्षक मा अतिश उघडे,नितिन साळवे,यशवंत गायकवाड,खंडू माळवे (कवी) गौतम शिंदे,अर्जुन सोनवणे,विजय वाघमारे,वसंत वाघमारे,मारूती खरात,जुन्नर तालुक्यातील उपासक,उपासिका,व बौध्दाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.वरील मान्यवरांनी राजा सम्राट अशोक यांच्या जीवनावर विषेश भाषणे केली. यशवंत गायकवाड यांनी तर जीवनपट भाषणातून प्रगट केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.राकेश डोळस यांनी सर्व जुन्नर तालुक्यातील उपासक उपसिका व कार्यकारणी यांचा आपल्या भाषणातून पुढील वाटचाल यांचा आढावा घेत मार्गदर्शन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजयजी धोत्रे यांनी उत्तम जबाबदारी पार पाडीत बुध्द वंदना घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here