आला पाऊस भरून
ढग दाटले नभात
गेली चमकून वीज
लख्ख उजेड घनात
तहानला शेतमळा
भेगा पडल्या भुईस
वारं सुटलं सुटलं
आता येईल पाऊस
जाऊ दोघंही शेतात
धरू हातात नांगर
दाम मिळेल पिकास
फेडू कर्जाचा डोंगर
स्वप्ने जुनीच डोळ्यात
चिंता काळजास जाळी
ओले आभाळ दुःखाचे
आहे फाटकीच झोळी
बळी आभाळास पाही
थेंब टपटप खाली
शेते पिवळी पिवळी
दंग आनंदाचे डोही
नाही कोणी वाली
आत्महत्या बळी करी
जरी पोशिंदा जगाचा
दुःख डोह त्याच्या उरी
सौ.गुलाब अनिल वेर्णेकर…

