
वंदना विनोद बरडे अधीसेवीका उपजिल्हा रूग्णालय वरोरा
वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक ५ एप्रिल २०२५ ला नर्सिंग क्षेत्रातिल उच्च व नामांकित असोसिएशनची विदर्भ लेव्हल ची मीटींग झाली.त्यात वंदना विनोद बरडे अधीसेवीका ह्या पण आमंत्रित होत्या.दिनांक ४ एप्रिल २०२५ ला टी.एन.ए.आय. च्या विदर्भ लेव्हलच्या निवडक झाल्या.त्यात वंदना विनोद बरडे अधीसेवीका ह्या निवडणूक साठी रिंगणात होत्या.निवडुन आलेल्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले.तसेच टी.एन.ए.आय.त्या संदर्भात कोण कोणत्या ठिकाणी कसे काम चालते.मेंबर झाल्याचे काय फायदे आहेत.हे समजावून सांगितले.त्या मध्ये नर्सिंग क्षेत्रातिल व्यक्तींनी जर रजीस्ट्रेशन केले तर १० लाखांचा अपघाती विमा आहे,जर काही क्रीटिकल आजार झाले तर त्यासाठी २ लाखांचा विमा आहे.तसेच नर्सिंग क्षेत्रातिल उच्च शिक्षणासाठी., व परदेशात शिक्षणासाठी पुर्ण मोफत शिक्षणाची सोय आहे.त्यासाठि टी.एन.ए आय चे आजिवन मेंबर्स होणे आवश्यक आहे.आपल्या बरोबर दुसऱ्या व्यक्तिंना फायदा व्हावा म्हणून वंदना यांनी आव्हान केले आहे की आपणं त्वरित आजीवन नोंदणी करावी.त्यामानाने नाममात्र शुल्क आकारले जाते.तसेच निवडणूक झाली तर आपल्या मेंबर झाल्यावर निवडणूक लढण्याचा अधिकार मीळतो.म्हणुन सर्वांनी आपले टि.एन.ए. आय चे रजिस्ट्रेशन करावे असं म्हणता आव्हान केले जात आहे.आणी त्याचा प्रचार व प्रसार करावा व इतरांचेही या माध्यमातून भले करावेत.या कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट दिपकमल व्यास नाॅशनल व्हाईस प्रेसिडेंट वेस्ट विभाग, रत्ना देवरे सेक्रेटरी टी एन ए आय एम एस वत्सला दिनाकरण अशिस्टन्ट सेक्रेटरी टि एन ए आय हेडक्वार्टर दिल्ली, सुचित्रा दळवी सोसीयल वेल्फेअर चेअरपर्स, राजाभाऊ राठोड अध्यक्ष टि एन ए आय एम एस बी, श्वेता दाभोलकर सेक्रेटरी टी एन ए आय एम एस बी,साईसागर श्रीसागर जाँईट सेक्रेटरी टी एन ए आय एम एस बी हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.सुंदर अश्या कार्यक्रमाचे आयोजन लता मंगेशकर हाॅस्पीटल मध्ये डॉ आम्रपाली व त्यांच्या टिमने केलें होतें.अती उत्साहात हा कार्यक्रम २०० मेंबर च्या उपस्थितित पार पडला.














