prabodhini news logo
Home कारंजा कारंजा येथे विश्वमांगल्य सभेची भव्य रामदिंडी उत्साहात आणि थाटात संपन्न

कारंजा येथे विश्वमांगल्य सभेची भव्य रामदिंडी उत्साहात आणि थाटात संपन्न

0
226

विश्वमांगल्य सभा मी राष्ट्रव्यापी महिला संघटन आहे. या संघटनेची मासिक सदाचार सभा ही नित्य कार्यपद्धती आहे. कारंजा मध्ये या सदाचार सभांच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेतल्या जात असतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षी श्रीराम दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या रामदिंडीची सुरुवात जे.डी शाळेपासून झाली यावेळी श्रीराम पालखीचे पूजन विश्व हिंदू परिषदेचे मंगेश कडेल आणि सौभाग्यवती शितलताई मंगेश कडेल या दाम्पत्यांनी केले. येथून श्रीराम दिंडी उत्साहात निघाली. छोटे राम मंदिर मधील विश्वस्त बुडेंच्या सौभाग्यवती चेतना बुडे यांनी पालखीचे पूजन केले.

या रामदिंडीमध्ये महिला उत्साहात पावली खेळल्या लहान मुलींचे लेझीम पथक होते. लहान मुली व मुलांनी लाठीकाठीचे चे प्रदर्शन केले . लहान मुले व मुलींची राम, लक्ष्मण, सीता व हनुमान च्या दोन झाकी सहभागी झाल्या होत्या . लहान झांकी मध्ये वल्लभ पाठक- राम, इशा सुरळकर -सीता ,अनुश्री जोशी- लक्ष्मण यांनी भाग घेतला आणि मोठ्या झाकीमध्ये अमृता राठोड- राम मोहिनी नाकट- सीता यांनी साकारली होती.
पालखीमध्ये बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. पालखीच्या मार्गामध्ये अनेक भक्तांनी पूजन केले. श्री विजय बगडे यांनी पालखीतील सर्वांना थंड पेयाचे वाटप केले . तसेच डॉक्टर श्री अभिजीत सोनटक्के यांनी मुलांना बिस्किटाचा खाऊ वाटप केला. प्रियांशु जनरल स्टोअर्स यांनी पाण्याची व्यवस्था केली. पालखी राम नामाच्या गजरामध्ये मोठे राम मंदिर येथे पोहोचली. तेथे पालखीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी कारंजा – मानोरा मतदार संघाच्या लाडक्या आमदार आणि विश्वमांगल्य सभेच्या पूर्व अधक्षा श्रीमती सईताई प्रकाश डहाके या उपस्थित होत्या. या ठिकाणी हनुमान चालीसा आणि रामरक्षा चे सामूहिक पठण करण्यात आले आणि आमदार सईताई यांचा भव्य सत्कार विश्वमांगल्य सभेच्या उपाध्यक्षा श्रीमती वैशालीताई नंदे यांनी केला . याप्रसंगी आमदार श्रीमती सईताई यांनी आपल्या विश्वमांगल्य सभेच्या अध्यक्ष असतानाचा अनुभव सांगितला आणि जेव्हा जेव्हा महिलांना काम पडेल तेव्हा तेव्हा मी त्यांच्या सोबत आहे असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले.
खिचडी प्रसादाचे वाटप काण्णव परिवारातर्फे करण्यात आले. तसेच त्यांनी लहान मुलांना आणि महिलांना कुल्फीचे वाटप केले.
ही राम दिंडी यशस्वी करण्या साठी संपूर्ण कार्यकारणी आणि कारंजातील भागा भागातील आठ सदाचार सभेच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्व हिंदू संघटनानी आणि पत्रकार यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here