prabodhini news logo
Home चंद्रपूर पालकमंत्री डॉ. अशोक उईके साधणार नागरिकांशी संवाद…

पालकमंत्री डॉ. अशोक उईके साधणार नागरिकांशी संवाद…

0
136

12 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्हा दौरा

स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – दि. 9 एप्रिल : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 12 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 12 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता वन अकादमी येथे मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कृती आराखड्याबाबत आढावा बैठक, दुपारी 3 वाजता इरई नदी संदर्भात बैठक, दुपारी 4 वाजता नियोजन भवन, पालकमंत्री यांच्या दालनात नागरिकांशी संवाद, सायंकाळी 6 वाजता महाकाली मंदीर येथे दर्शन व त्यानंतर सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here