सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी, (दि.7) सकाळी 11 वाजताच्या सुमारास सिरोंचा शहरातील प्रभाग क्र. 16 येथे घडली. या आगीत गणेश पोचम मंचार्ला यांचे जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती होताच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी मंचरला कुटुंबीयांना भेट दिली. व त्यांच्या घराची पाहणी केली. व दु:खी कुटुंबीयांना धीर देत त्यांना आर्थिक मदत केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर किलोरी, नगरसेवक सतीश भोगे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सलाम शेख, चंद्रकला अनपरती, मदनया मादेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, उपस्थित होते.

