prabodhini news logo
Home गडचिरोली आमदार रामदास मसराम यांची वीज वितरण विभागास भेट

आमदार रामदास मसराम यांची वीज वितरण विभागास भेट

0
102

शेती वीज पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील वीज संबंधित समस्या सोडवण्यासाठी आमदार रामदास मसराम यांनी गडचिरोली येथील वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. डोंगरवार यांच्या कार्यालयाला भेट दिली.

या भेटीदरम्यान आमदार मसराम यांनी क्षेत्रातील शेती वीज पुरवठ्यावर विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली. “शेतकरी बांधवांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागता कामा नये,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यांनी वीज खंडित होणे, खांब व तारा तांत्रिक दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर बदल अशा विविध बाबींवरही चर्चा केली. कार्यकारी अभियंता डोंगरवार यांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

त्या वेळी उपस्थीत जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गड महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,माजी जिल्हा प. उपाध्यक्ष गड तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, माजी जिल्हा प. सदस्य गड प्रभाकर तुलावी, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, माजी काँग्रेस क. तालुकाध्यक्ष कुरखेड .जयंत हरडे,भाग्यवान मेश्राम,कमलेश बारस्कर, सागर वाढई,गरीबदास बाटबरवे, स्वप्नील मिसार,गौरव शिलार, शैलेश येलगंदवार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here