परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज दिनांक 12/04/2025 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता प्रभाग क्रमांक 5 मधील येलदरकर कॉलनी मध्ये 150 लक्ष रुपये निधीच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा परभणी शहराचे प्रथम महापौर प्रताप देशमुख व शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण मुखी हनुमान मंदिर येलदरकर कॉलनी येथे पार पडला आहे. हा विकास निधी जिल्हा नियोजन समितीतुन पालकमंत्री संजय बनसोडे यांनी प्रताप देशमुख व आनंद भरोसे यांच्या शिफारशी वरुण आणि रामेश्वर आवरगंड यांच्या मागणीवरून मंजूर केला होता. या लोकार्पण सोहोळ्यास परभणी मनपा उपायुक्त तुकारामजी कदम,कॉल नी समितीचे अध्यक्ष पांडुरंगराव आवरगंड, सचिव डॉ.धनंजय औंढेकर साहेब, ऐश्वर्य वरपूडकर, रितेश जैन, बबलू टाक, गुतेदार बंटी जावळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य शंकर भागवत, सुरेश दादा काळे, सुदाम तूपसुंदरे, रामभाऊ भवर, सचिन सोनटक्के, रामदास कदम कॉलनीतील जेष्ठ नागरीक प्रा.ज्ञानोबा मुंढे, प्रकाश ढगे, , रामचंद्र पाणपट्टे साहेब, बालाजी मोहाळे साहेब, माणिकराव आळंदकर सर, माणिकराव लोहट, लिंबाजी आणा भोसले, प्रभाकरराव शेरे, नखाते सर, एस.पी. कुलकर्णी, सोपान ढगे, माऊली गरुड, सचिन गायकवाड, प्रा.अशोक उबाळे, पवन सुर्यवंशी, रितेश लासे आदी कॉलनीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते ..

