ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 14 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद, ठाणे येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे आणि लेखाधिकारी (2) रविंद्र सपकाळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

