तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – भारत देशाच्या संविधानाचे शिल्पकार,महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या निमित्याने स्थानिक विकलांग सेवा संस्थेमार्फत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. सोबतच मिठाईचे वितरण करण्यात आले आणि निवडक महिला व युवतीना सॅनेटरी पॅड तसेच पर्यावरण पूरक कापडी बॅगचे वितरण करण्यात आले.
यासाठी कमफोर्ट फौंडेशन मुंबई, प्रा. प्राजक्ता वासेकर यु एस ए , म. रा. वखार महामंडळ व्यवस्थापक संजय डाखोरे, आश्रमशाळा अधिक्षिका रेखा बुरांडे , नितिन राव वीज केंद्र कर्मचारी उरण ह्यानी अर्थ पूर्ण सहयोग दिला.
कार्यक्रम यशस्वी कrण्यासाठी देवराव कोंडेकर,राजश्री शिंदे, सीमा दुपारे, पूजा चहारे ,प्रसाद पान्हेरकर यांनी सहयोग दिला.

