सुरेखा गांगुर्डे तालुका प्रतिनिधी, देवळा – तालुक्यातील भऊर येथे गेल्या महिन्यापासून महामानवाच्या जयंती ची तयारी मोठ्या जल्लोषात चालू होती.
आज सकाळी महामानवाचे पूजन करण्यात आले, त्यानंतर चिमुकल्यांचा संस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, कर्मचारी व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

