जिजाऊ रथाचे चंद्रपुर नगरीत जल्लोषात स्वागत

0
59

स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर, चंद्रपूर – दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी जिजाऊ रथाचे सायंकाळी ७ वाजता चंद्रपूर नगरीत आगमन झाले. त्या वेळेस चंद्रपूर नागपूर हायवे रोड असणाऱ्या संत तुकाराम महाराज चौक येथे ऊर्जानगर वसाहत येथील मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या तर्फे जिजाऊ रथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच तुमचे आमचे नाते काय,” जय जिजाऊ जय शिवराय” अशा विविध प्रकारचे नारे देण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर शाखेच्या जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघातर्फे जनता कॉलेज चौकातही ढोल ताशाच्या गजरात व आदिवासी नृत्य सादर करून जिजाऊ रथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नंतर शहरातील न्यु इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत शिवश्री सौरभ खेडेकर यांनी जिजाऊ रथ यात्रा काढण्याचे उद्दिष्ट काय हे स्पष्ट केले तसेच जिजाऊ ब्रिगेड प्रदेश अध्यक्षा सिमाताई बोके यांनी वेरूळ येथून निघालेल्या जिजाऊ रथ यात्रे बद्दल तालुक्याच्या ठिकाणी व गावोगावी झालेल्या स्वागता बद्दल माहिती दिली.
चंद्रपूर येथे झालेल्या जाहीर सभेचे सूत्रसंचालन शिवश्री प्रशांत गोखरे यांनी केले तर प्रास्ताविक शिवश्री दिलीप चौधरी अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड चंद्रपूर यांनी सादर केले. तसेच विचार पिठावर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा अर्चना चौधरी, मराठा सेवा संघाचे दिपक जेऊरकर, ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. सभेचे आभार प्रदर्शन शिवमती प्रितमा परकारे यांनी केले. सदर आयोजीत कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद व शहरातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here