वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्र शासन राज्य सरकारच्या राज्य स्तरावरील सुचनेनुसार सर्वांना कंपलसरी सि पि आर देता आला पाहिजे.याचे ट्रेनिंग डॉ अंकुश राठोड प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केले होते .या ट्रेनिंग साठी ट्रेनर म्हणून डॉ सुशिम लोणारे आॅनेस्थेटीक डॉ आकिब शेख फिजिशियन होते.वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी या ट्रेनिंगची संकल्पना समजावून सांगितली.आणी त्याचे काय महत्त्व आहे.आणी कसा आपणं एखाद्याचा जिव वाचवुंन जिवन दान देऊ शकतो.हे समजावून सांगितले. त्याचा प्रचार व प्रसार करून जनजागृती करुन जनतेला या सेवेबाबत आश्वासीत करणे व त्या बाबत अवेअरनेस करणे आहे.
दोन्ही डॉक्टरांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ट्रेनिंग दिले व प्रात्यक्षिक करून घेतले.तसेच शंका कुशंकांचे निराकरण केले. आणि खेळीमेळीच्या वातावरण हे ट्रेनिंग पार पडले. या ट्रेनिंगला डॉ,पाॅरामेडिकल स्टाफ, मेट्रन, परिसेवीका,अधिपरिचारीका, कक्षसेवक उपस्थित होते.

