२१ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत रवाना…
तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
अहेरी: इंस्टाग्राम वरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत युवतीसोबत जबरदस्ती लैंगिक संबंध प्रस्थापित करून अश्लिल फोटो पोस्ट करणाऱ्या आरोपीस अहेरी पोलिसांनी दिल्ली येथून जेरबंद केले असून त्याची 21 एप्रिल पर्यत अहेरी न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
आरोपीचे नाव शाहानवाज मलिक वय 22 वर्षे रा.मेरठ (उत्तरप्रदेश) असे आहे.
जून 2023 मध्ये इंस्टाग्राम वर युवती व आरोपीची ओळख झाली. काही दिवसानी आरोपी हा सेंट्रींगच्या कामासाठी अहेरी येथे आला. 11 जून 2023 आरोपी व तरुणीची पहिली भेट झाली. त्यानतर आरोपी याने युवतीला जुलै 2023 मध्ये खोलीवर बोलवून तिच्यासोबत तिला जवळ घेवून शारिरीक लैंगिक संबंध प्रस्थापित केले.व तिचे मोबाईल मध्ये फोटो काढले तसेच त्यानंतर अनेकवेळा आरोपीने तरुणीला त्याच्या रूमवर बोलवून मी तुझे फोटो व्हायरल करेल असे म्हणून बरेच वेळेस तिच्या अल्पवयाचा फायदा घेऊन जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच तिला अनेक वेळा व्हिडिओ कॉल करून तुझे कपडे काढून तुला मला बघायचे आहे असे म्हणुन तिचे व्हिडिओ तयार केले .
तरुणीने आरोपीला माझे मामा माझ्यासाठी मुलगा बघत आहे असे सांगितले असता तुझे कोणासोबतही लग्न होवू देणार नाही असे म्हणून मी तुला मारून टाकेल अशी धमकी देत होता.
फिर्यादी हिने आरोपीला मला लग्नासाठी मुलगा बघायला येणार आहे असे सांगितले असता आरोपीने फिर्यादीचे इंस्टाग्राम व फेसबुकवर फिर्यादीचे कपडे काढलेले व्हिडीओ अपलोड करून फिर्यादीची बदनामी केली .
तरुणीच्या तक्रारी वरून अहेरी पोलिसांनी आरोपीचा माग घेऊन
दिल्ली येथून त्याला ताब्यात घेतले. अहेरी न्यायालयात त्याला हजर केले असता 21 एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात अहेरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक स्वप्नील ईज्जपवार तपासी अधिकारी म्हणून काम बघत आहेत.

