सुरेखा गांगुर्डे तालुका प्रतिनिधी देवळा – कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे प्रथम वर्ष कला वर्गात शिकत असलेला माजी विद्यार्थी कुमार नितीन पळसे यास शेक्षणिक वर्ष 2022 – 2023 मधील महाराष्ट्र शासनाचा क्रीडा पुरस्कार योगासन या क्रीडा प्रकारात पहिला शिवछत्रपती पुरस्कार काल पुणे विभागातून दिनांक 18 एप्रिल 2025 राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला , तसेच म वी प्र संस्थेचे सरचिटणीस डॉ ॲड नितीनजी ठाकरे, दिंडोरी तालुका कार्यकारिणी संचालक प्रवीण नाना जाधव, मवीप्र शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन शिंदे, स्थानिक विकास समिति अध्यक्ष राकेश थोरात,डॉ वाय एम साळुंके, उपप्राचार्य, प्रा. नितीन बोरसे IQAC समन्वयक तसेच शारीरिक शिक्षण संचालक डॉ रविंद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या….

